धोनीने सलमान खान सोबत साजरा केला वाढदिवस , सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

0
54

आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याचा 43 वा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एमएस धोनीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खानने महेंद्रसिंग धोनीला शुभेच्छा दिल्या आहेत. माहीसोबतचा एक फोटो त्याने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

धोनी आणि पत्नी साक्षी हिचा वाढदिवसानिमित्त केक कापतानाचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. धोनी केक कापत असताना साक्षी त्याच्या बाजूला उभी आहे. यानंतर तिने धोनीला केक भरवला. यावेळी सलमान खान देखील उपस्थित होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही माहीची क्रेझ कमी झालेली नाही. चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटरला त्याच्या वाढदिवसानिमित्त आपापल्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या. त्याच्या चाहत्यांच्या यादीत त्याची पत्नी साक्षीचे नाव अग्रस्थानी आहे. साक्षीने पती महेंद्रसिंग धोनीला त्याच्या 43 व्या वाढदिवसानिमित्त स्पेशल केक दिला. महेंद्रसिंग धोनीने पहिला केक कापला तेव्हा सलमान खानने साक्षी धोनीला आधी तो खायला सांगितला. यानंतर माहीने भाईजानचे तोंड गोड केले. याशिवाय माहीच्या वाढदिवसाला अनेक सेलिब्रिटी दिसले. मात्र, सलमान खानची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

धोनी सर्वात यशस्वी कर्णधार-
भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये महेंद्रसिंग धोनीचे नाव सामील आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 टी-20 विश्वचषक जिंकला होता. यानंतर 2011 चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तसेच, धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 बनला आहे. भारताने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2013 जिंकली होती, धोनी त्या भारतीय संघाचा कर्णधार होता.याशिवाय महेंद्रसिंग धोनीची गणना आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. महेंद्रसिंग धोनीशिवाय फक्त रोहित शर्माने कर्णधार म्हणून 5 वेळा आयपीएल जिंकले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here