‘बिग बॉस मराठी’च्या यंदाच्या सीझनमध्ये अनेक ट्वीस्ट येत आहेत. या ट्वीस्टमुळेही घरातील समीकरणांवर परिणाम होत आहे. वीकेंडला झालेल्या भाऊचा धक्क्यानंतर आता घरात नवीन समीकरणं तयार होणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. टास्कच्या वेळी एकमेकींना पाण्यात पाहणाऱ्या अंकिता वालावलकर आणि निक्की तांबोळी यांच्यात आज संवाद होताना दिसणार आहे. यामध्ये निक्की हे अभिजीतचे सत्य सांगणार आहे.
एकीकडे घरात आज कठीण टास्क पार पडणार आहे. तर दुसरीकडे घरातील काही सदस्य एकमेकांकडे एकमेकांबद्दलचं गॉसिप करताना दिसणार आहेत. अभिजीत आर्याबद्दलचं त्याचं मत अंकिताकडे मांडताना दिसणार आहे. तर निक्की अंकिताला अभिजीतबद्दल सांगताना दिसून येणार आहे. तर, घन:श्याम आणि पॅडीदादा अरबाजबद्दल बोलताना दिसणार आहेत.
निक्की सांगणार अंकिताला सत्य…
निक्की आणि अभिजीतच्या मैत्रीवर अनेकदा अंकिताने आक्षेप घेतले आहेत. अभिजीतने निक्कीसोबत मैत्री करणे म्हणजे ग्रुपला धोक्यात घालण्यासारखं असल्याचे अंकिताने याआधी म्हटले. तर, निक्की आणि अंकिता अभिजीतबद्दल बोलताना दिसणार आहेत. निक्की अंकिताला म्हणते की,”माझ्यापेक्षा जास्त विश्वास अभिजीतचा तुझ्यावर आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही दोघं सोबत आहात. आमची फ्रेंडशिप असली तरी त्याचं तुझ्यासोबत एक वेगळं कनेक्शन आहे. काल तू घराबाहेर जाणार असल्याची घोषणा केली तेव्हा अभिजीत म्हणाला होता की, मी संपलो आणि त्याच्या डोळ्यात अश्रू होते. माझ्यावरुन वरचा दर्जा तो तुला देतो. त्याला तुझी गरज आहे, असे निक्की अंकिताला सांगताना दिसते.
आर्यावर अभिजीत नाराज
अभिजीत सावंत हा आर्यावर नाराज असल्याचे एका प्रोमोत दिसून आले. अभिजीत हा अंकिताला म्हणतोय,”मी तुला एक सांगतो. आर्याचं मी एंटरटेंन्ट करत बसणार नाही”. त्यावर अंकिता म्हणते,”मी आर्याला स्वत: सांगितलं आहे ज्या लेव्हलपर्यंत मी तुला समजावू शकते तिथपर्यंत मी समजावणार. पण त्यापुढे नाही”. यावर अभिजीत म्हणतो,”आर्याला उगाच आपण भाव देतोय. ज्याचा काही अर्थच नाही. ग्रुपमध्ये आर्याची किंमत काय हे सर्वांना माहिती आहे”.
पहा पोस्ट: