‘कार बिघडली होती’ , आरोपीला वाचवण्यासाठी वकिलांचा नवा कांगावा

0
1

बिघाड असतानाही पोर्शे कार विशाल अग्रवालने मुलाला चालवायला परवानगी दिली, असा जबाब चालकाने पोलिसांना दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. परंतु बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल, असा प्रश्न कोणत्याही सुज्ञान व्यक्तीला पडेल. त्यामुळेच पुण्यातील कल्याणीनगरमध्ये दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

पुण्यातील अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशल अग्रवालसह तिघांना काल न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीत कोठडी सुनावली आले.विशाल अग्रवाल यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. विशाल अग्रवाल यांच्याकडून त्यांचे वकील प्रशांत पाटील युक्तिवाद केला. विशाल अग्रवाल यांचा बचाव करताना आलिशान पॉर्शे कारमध्ये तांत्रिक बिघाड असल्याचा युक्तिवाद करण्यात आला होता. युक्तिवाद करताना विशाल अग्ररवाल यांचे वकील म्हणाले, अपघातापूर्वीत कारमध्ये बिघाड असल्याचे विशाल अग्रवाल यांच्या निदर्शनास आले होते. या बिघाडासंदर्भात त्यांनी कंपनीशी देखील संपर्क साधला होता. मात्र कंपनीने त्यांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने विशाल अग्रवाल यांनी ग्राहत तक्रार निवाारण आयोगात तक्रार केली होती.

बिघडलेली कार एखादा पिता आपल्या मुलाला कसा देईल?
आता एकीकडे कारमध्ये बिघाड असल्याचा युक्तीवाद विशाल अग्रवाल यांच्या वकिलांनी केला. तर दुसरीकडे विशाल अग्रवाल यांच्याकडे काम करणाऱ्या ड्रायव्हरने मुलाने कार चालवायला मागितली तर त्याला चालवायला दे, तू मात्र त्याच्या बाजूला बस, अशी सूचना अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी दिल्याचे ड्रायव्हर सांगत आहे. वकिलांची आणि ड्रायव्हरची दोन्ही वक्तव्ये ही विरोधाभासी वाटतात. कारण जर कारमध्ये बिघाड होता तर ती कार आपल्याा पोटच्या मुलाला चालवण्यासाठी कोणते वडिल देतील? असा सवाल सुज्ञान व्यक्तीला सध्या पडत आहे.

दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी नवा कांगावा
अगोदरच पुण्यातील अपघाताच्या घटनेनंतर पोलिसांकडून (Pune Porsche Car Accident) कारवाईत दिरंगाई आणि कुचराई झाल्याचा आरोप केला जात आहे. पोलिसांच्या (Pune Police) या कार्यपद्धतीमुळे जनतेमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. त्यात 15 तासात जामीनावर तो बाहेर आला. पुण्यात दारुड्या पोरानं दोघांचे बळी घेतल्याच्या घटनेत पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होतोय. सोशल मिडीयावर पोलिसांवर यथेच्छ टीका होतेय. अल्पवयीने मुलाचा ब्लड रिपोर्ट सध्या मोठ्या कुतूहलाचा विषयच आहे, त्यात आता वकिलांचा युक्तीवाद आणि ड्रायव्हरचा जबाब पाहता दोन जणांचा जीव घेणाऱ्या मुलाला वाचवण्यासाठी हा नवा कांगावा तर नाही ना अशी शंका उपस्थित होत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here