ताज्या बातम्याक्रीडामनोरंजन

बॉलीवूड सुपरस्टारची तब्येत खालावली ; डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल

माणदेश एक्सप्रेस न्युज :  सुपरस्टार शाहरुख खानची प्रकृती खालावली आहे. त्यांना तातडीने अहमदाबादच्या ‘केडी’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, अतिउष्णतेमुळे अभिनेता डिहायड्रेशनचा बळी ठरला आहे. काल अहमदाबादमध्ये तापमान 40अंशांच्या पुढे होते.

KKR चा मालक शाहरुख खान काल रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचला. यावेळी तो मैदानावर चाहत्यांना टाळ्या वाजवताना आणि जल्लोष करताना दिसला. त्यांचा संघ सनरायझर्स हैदराबादला हरवून आयपीएल 2024 च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे.

शाहरुख खानला 22 मे रोजी डिहायड्रेशनमुळे अहमदाबादच्या केडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यानंतर चाहत्यांची चिंता वाढली होती. याची माहिती मिळताच पत्नी गौरी खान यांनीही तात्काळ हॉस्पिटल गाठले. अभिनेत्री जुही चावलानेही तिचा मित्र आणि KKR टीम पार्टनर शाहरुखची तंदुरुस्तीची विचारपूस केली. मात्र आता या अभिनेत्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button