करगणीत एस.टी. चालकाची आत्महत्या

0
1835

माणदेश एक्सप्रेस न्युज

आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यतील करगणी येथे एस.टी. चालकाने आत्महत्या केल्याची घटना आज दिनांक २८ रोजी घडली. सदर प्रकरणी आटपाडी पोलिसात नोंद झाली आहे.

 

 

अधिक माहिती अशी, यातील मयत आरिफ वजीर इनामदार  (वय ५०) हे आटपाडी आगार येथे चालक म्हणून कार्यरत होते. काही दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. परंतु काल दिनांक २८ रोजी पहाटे ५.३० च्या दरम्यान त्यांनी घरापाठीमागील झाडाला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी, आटपाडी ग्रामीण रुग्णालयातील डॉ.कवडे यांनी आटपाडी पोलिसात फिर्याद दिली असून, आटपाडी अधिक तपास करत आहेत.

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here