सूर्याच्या कॅचवरुन वाद घालणाऱ्यांच दक्षिण आफ्रिकेच्याच प्रसिद्ध खेळाडूने तोंड केलं बंद

0
47

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये T20 वर्ल्ड कप 2024 च्या फायनलचा सामना खूपच रंगतदार झाला. अगदी लास्ट ओव्हरपर्यंत श्वास रोखले गेले होते. शेवटच्या षटकात दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 16 धावांची गरज होती. डेविड मिलर हा दक्षिण आफ्रिकेचा धोकादायक फलंदाज क्रीजवर होता. टीम इंडियाकडून हार्दिक पांड्या गोलंदाजी करत होता. त्याच्या पहिल्याच चेंडूवर मिलरने सिक्स मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूर्यकुमार यादवने बाऊंड्रीवर हैराण करुन सोडणारा एक झेल पकडला. टीम इंडियाला ट्रॉफी जिंकून देण्यात या कॅचच खूप महत्वाच योगदान आहे. सूर्याच्या या कॅचवरुन आता वाद सुरु आहे. या वादांदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू शॉन पॉलकने सूर्याच्या कॅचवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलय.

शॉन पॉलकने सूर्यकुमार यादवने कॅच मागच पूर्ण सत्य सांगितलं. पॉलकन टाइम्स ऑफ कराचीला मुलाखत दिली. “सूर्यकुमार यादवने मिलरचा जो कॅच पकडला, तो पूर्णपणे योग्य होता. त्यात कुठलीही कमतरता नव्हती. सूर्यकुमार यादवचा बाऊंड्रीच्या रोपच्या कुशनला पाय लागला नाही” असं शॉन पॉलकने म्हटलं आहे. पॉलकने सूर्याच्या कॅचच कौतुक केलं. या मॅचच्यावेळी पॉलक सुद्धा मैदानात उपस्थित होते. यावरुन टीम इंडियावर होणारे आरोप तथ्यहीन असल्याच स्पष्ट होतं.

सत्य काय ते सांगितलं

सूर्यकुमार यादवने या कॅचची शनिवारपासून चर्चा आहे. एकाबाजूला सूर्यकुमार यादवच भरपूर कौतुक झालं. दुसऱ्याबाजूला त्याचा पाय बाऊंड्री रोपला लागल्याचा आरोप झाला. बाऊंड्री रोप वास्तविक रेषेपासून मागे हटवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. आयसीसीच्या बाऊंड्री नियमांनुसार हा सिक्स आहे पण अंपायर्सनी घाईगडबडीत चुकीचा निकाल दिला असा आक्षेप आहे. आता दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनेच सत्य काय ते सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here