प्रेमसंबंधाला घरांच्यानी विरोध केल्यामुळे प्रेमयुगल जोडप्याची रेल्वे समोर उडी घेत केली आत्महत्या

0
41

उत्तर प्रदेशातील जालौन येथे एका प्रेमयुगल जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांन्ही रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या केल्यानंतर दोघांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या प्रेमसंबंधाला घरांच्यानी विरोध केल्यामुळे दोघांन्ही टोकाचे उचलले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नातेसंबंधात ते दोघे जण काका आणि भाची होते. दोघांन्ही ३० जून रोजी आत्महत्या केली. शनिवारी २९ जून रोजी तरुणी प्रियकराच्या घरी आली होती. दोघांच्या प्रेमाला घरांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी पाऊल उचलेले आहे. जेव्हा तरुणी काकाच्या घरी आली त्यावेळी तीच्या कुटुंबियांनी देखील विरोध केला. ३० जून रोजी जोडप्याने रेल्वे ट्रॅकवर उभे राहून स्कार्फने हात बांधले आणि एकमेकांना मिठी मारून रेल्वे ट्रॅकवर पडून राहीले. त्यानंतर ट्रेनने जोडप्यांना उडवले. ही घटना गावात पसरली.

मनीष कुमार ( २३ ) आणि दीक्षा गौतम (२०) असं आत्महत्या करणाऱ्या जोडप्याचे नाव आहे. दोघांच्या आत्महत्यानंतर कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. जालौन जिल्ह्यातील बारडोली गावातील काल्पी कोतवाली परिसरात ही घटना घडली. दीक्षा ही मनिषच्या चुलत भावाची मुलगी होती. त्यामुळे ते अनेकदा घरी ये जा करत.

दोघे ही काही वर्षापासून प्रेमसंबंधात होते. शनिवारी त्यांनी कुटुंबियांना त्याच्या नात्यासंदर्भात माहिती दिली आणि लग्नाबाबत विचारणा केली.परंतु कुटुंबियांनी या प्रेमसंबंधाला विरोध केला. यालाच हताश होऊन दोघांन्ही टोकाचे पाऊल उचलले. दोघांचा मृतदेह सापडल्याने ही घटना उघडकीस आली.