धक्कादायक! महाराष्ट्रातील महिलेचा कर्नाटकात मृत्यू ;मृतदेह घेऊन फिरावे लागले सांगलीत

0
2

गर्भपातासाठी कर्नाटक मध्ये गेलेल्या एका महिलेचा गर्भपाता दरम्यान मृत्यू झाल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर मृत्यूच्या दाखल्यासाठी मृत महिलेचे नातेवाईक मृतदेह घेऊन सांगली शहरभर होते. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. सांगली शहर पोलिसांच्य सतर्कतेमुळे हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी संबंधित मृत  महिलेच्या माहेरच्या 5 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ज्यामध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले येथील सासर आणि सांगलीच्या मिरजेतील माहेर असणारी 32 वर्षीय महिलेचे गर्भलिंग करण्यात आला होते. ज्यामध्ये मुलगी असल्याने गर्भपात करण्याचा निर्णय माहेरच्या लोकांसह गर्भवती महिलेने घेतला. त्यांनी थेट कर्नाटक राज्यातल्या बागलकोट येथील महालिंगपूर मधील एक हॉस्पिटल गाठले.

मात्र, गर्भपात करताना सदर महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या मृत्यूचे कारण देण्यासाठी दाखला गरजेचं होतं. पण संबंधितांच्याकडून गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्याचे कारण देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे मृत्यु दाखला मिळवण्यासाठी नातेवाईक महिलेचा मृतदेह घेऊन सांगली आणि मिरजेत तीन तास भटकंती करत होते. या दरम्यान सांगली पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी गाडीचा चौकशी केली असता हा सर्व गर्भपात मृत्यूचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी डॉक्टरसह पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती शहर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी दिली आहे.

गर्भपात करण्याऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
संभाजीनगरमध्ये अवैध गर्भलिंग निदान केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यावरून अनेक धागेदर उलगडत गेले आणि गर्भपात करण्याचं एक रॅकेटच उघड झालं. साक्षी थोरात या तरुणीकडे गर्भलिंग निदान करून त्यांचे एजंट महिलांना गर्भपातासाठी सिल्लोडला न्यायचे. त्याठिकाणी महिलांना डॉक्टर ढाकर याच्या हॉस्पिटलमध्ये नेऊन गर्भपात केला जायचा. धक्कादायक म्हणजे गर्भपात झाल्यावर अर्भकाचे तुकडे करून आसपासच्या शेतात पूरले जायचे. किंवा नाल्यातही फेकले असल्याचा संशय आहे. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 11 आरोपींना अटक केलीय.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here