धक्कादायक! गिरणीत धान्य टाकताना मशीनच्या पट्ट्यात ओढणी अडकली, महिलेचा जागेवरच मृत्यू

0
21

गोंदिया जिल्ह्यातील नवेगावबांध परिसरातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. ज्यामध्ये महिलेने धान्य दळण्यासाठी मशीनमध्ये धान्य टाकताच ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे महिलेचे डोके शरीरापासून वेगळे आहे. मृत महिलेचे वय 46 वर्षे आहे. या घटनेनंतर गावातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. नीतू हर्षल उजवणे असे मृत महिलेचे नाव आहे. नवेगावबांध परिसराच्या आझाद चौकातील हर्षल उजवणे यांच्या गिरणीत ही घटना घडली. नेहमीप्रमाणे हर्षलची पत्नी नीतू पिठाच्या गिरणीत धान्य टाकत होती. त्या दरम्यान ही घटना घडली.

पिठाच्या गिरणीत धान्य टाकत असताना नीतूची ओढणी गिरणीच्या पट्ट्यात अडकली. त्यामुळे महिलेचे डोके पिठाच्या गिरणीत अडकले आणि धड वेगळे झाले. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने नीतूच्या मृत्यूनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here