“उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्रचे चित्र उत्तम काढले जातात”; संजय राऊतांचा फडणवीसांना टोला

0
8

लोकसभा निकालानंतर राज्यात सत्ता समीकरणं बदलाची शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. महाविकास आघाडीला लय आणि गती सापडली आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास दुणावला आहे. विधानसभा निवडणुका आता हातातोंडाशी आल्या आहेत. तोपर्यंत दोन्ही बाजूने एकमेकांवर हल्लाबोल होत आहे. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीसंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पण टोला लगावला आहे.

देशातील संविधान धोक्यात

विधानसभेचे अध्यक्ष जे तटस्थ असतात त्यांनी पक्षपाती निर्णय देऊन सरकार वाचवले, असा आरोप त्यांनी केला. आम्ही जे म्हणत होतो या देशातल्या संविधान धोक्यात आहे. या देशातल्या संविधान धोक्यात आहे यांच्या हातून संविधानाची हत्या होत आहे. नरेंद्र मोदी, अमित शाह,देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर ही त्याची ज्वलंत उदाहरणं आहेत. महाराष्ट्रातील सरकार राज्यपालांनी अत्यंत घटनाबाह्य पद्धतीने सरकार आणले. ते वाचविण्यासाठी पंतप्रधान, गृहमंत्री, राज्यपाल, न्यायालय, विधानसभा अध्यक्षांनी कृती केली असा घणाघात त्यांनी केला.

महायुती सरकार ऑक्सिजनवर

महायुती सरकार ऑक्सिजनवर असल्याचे मोठे भाष्य संजय राऊत यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी केले आहे. हे फसवणुकीतून आलेले सरकार राज्याच्या छाताडावर बसले. लोकांनी या लोकसभा निवडणुकीत त्यांना लाथळले आहे. आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांचा दारुण पराभव होणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यांच्यात हिंमत होती तर त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करून स्वतःच्या चिन्हावर निवडणुका लढायला हव्या होत्या. लोकांनी हेलिकॉप्टर मधून कसे पैसे उतरत होते आपण पाहिले आहे मिंध्ये मुख्यमंत्री अनेक मतदारसंघात चार-चार दिवस जाऊन हॉटेलचा रूममध्ये बसून कसे पैसे वाटत होते हे आपण पाहिले, असा आरोप त्यांनी केला.

फडणवीसांना टोला

देवेद्र फडणवीस यांनी काल उद्धव ठाकरे यांना टोला लगावला होता. त्याला राऊतांनी उत्तर दिले. उत्तम फोटोग्राफर असला की महाराष्ट्रचे चित्र उत्तम काढले जातात आणि त्याने ते चित्र काढलेला आहे आणि ते चित्र इतके विदारक आहे महाराष्ट्राचं आणि म्हणून लोकसभेत तुमचा पराभव झाला त्याच्यामुळे त्यांना अडचण होणारच. देवेंद्र फडणवीस हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात दखलपात्र राहिलेले नाहीत, असा टोला त्यांनी हाणला.