
सापाचे नाव जरी घेतल तरी काही जणांच्या अंगावर काटा येतो. त्यात सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही दिवसांपूर्वी एका तरुणीच्या डोक्यांवर साप रेंगाळत असल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यात आणखी एका व्हिडिओची भर पडली आहे. चक्क वाहन चालकाच्या शर्टमधून साप निघाला आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील असल्याचे बोललं जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पामधील आहे. जिप्सी चालक यांच्या शर्टमध्ये साप लपून होता. जेव्हा ते सफारीसाठी तयारी करत होते. त्यांनी शर्ट परिधान केल्यानंतर त्यांना हालचाल जाणवली होती. त्यांना साप असल्याचा संशय आला. त्यानंतर त्यांच्या सर्प मित्रांनी हा साप शर्टांतून बाहेर काढला. ही घटना एकाने फोनमध्ये कैद केली. या घटनेचा व्हिडिओ साम टीव्हीच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे.
प्रमोद गायधने असं जिप चालकाचे नाव आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुखापत झाली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रिया केल्या आहेत. एकाने लिहले आहे की हा पान दैवत सर्प आहे.
पहा व्हिडीओ:
instagram.com/reel/C80_A-oup_b