धक्कादायक! ED अधिकाऱ्याचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला, जीवन संपवलं की घातपात?

0
281

दिल्लीच्या प्रवर्तन निर्देशालयमध्ये तैनात अधिकारी आलोक कुमार रंजन यांनी मंगळवारी संध्याकाळी जीवन संपवलं. आलोक कुमार रंजन यांचा मृतदेह साहिबाबाद रेल्वे ट्रॅकवर मिळाला. माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवून दिला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ED चे अधिकारी सुद्धा तिथे पोहोचले. आलोक कुमार रंजन कथित भ्रष्टाचार प्रकरणात ED आणि CBI च्या चौकशीच्या फेऱ्यात होते. चौकशीत नाव आल्यामुळे ते चिंतेत होते.

या महिन्याच्या 7 ऑगस्टला ED चे सहाय्यक निर्देशक संदीप सिंह यांना 50 लाख रुपयाची लाच मागितल्या प्रकरणी CBI ने अटक केली होती. मुंबईच्या एका ज्वेलरने CBI कडे तक्रार केली होती. काही महिन्यापूर्वी ED ने आपल्या दुकानावर धाड टाकली होती. ED ने त्यानंतर आपल्या मुलाची चौकशी केली. ED कडून मुलाला अटक करण्यात आली असती, पण अटक टाळण्यासाठी त्या बदल्यात सहाय्यक निर्देशक संदीप सिंह यांनी 50 लाख रुपयांची मागणी केली होती.

घटनेच मुंबई कनेक्शन

ज्वेलर आपल्या मुलाला अटकेपासून वाचवण्यासाठी पैसे द्यायला तयार झाला. पण त्याने ही तक्रार CBI कडे केली. सात ऑगस्टला सहायक निर्देशक संदीप सिंह यांना 20 लाख रुपयाची लाच घेताना दिल्लीच्या लाजपत नगरमधून CBI ने अटक केली. CBI ने संदीप सिंह यांच्याविरुद्ध FIR नोंदवला. मुंबईत ज्वेलरच्या दुकानावर ED ने छापा मारला, त्यावेळी संदीप सिंह त्या टीमचे भाग होते असं CBI ने सांगितलं.

म्हणून आलोक रंजन टेन्शममध्ये

CBI ने लाच प्रकरणात संदीप सिंहची चौकशी केली, त्यात आलोक कुमार रंजन यांचं नाव समोर आलं. CBI ने आपल्या FIR मध्ये आलोक रंजन यांच नाव सुद्घा घेतलं होतं. CBI च्या FIR मध्ये नाव आल्याने आलोक रंजन टेन्शनमध्ये आले. या दरम्यान ED ने सुद्धा तपास सुरु केला. सर्वप्रथम ED ने सहाय्यक निर्देशक संदीप सिंह यांना निलंबित केलं.

मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा गुन्हा

ED चे सहाय्यक निर्देशक संदीप सिंह यांच्यासोबत CBI च्या एफआयआरमध्ये नाव आल्याने आलोक कुमार रंजन यांना मोठा धक्का बसला होता. त्यात आणखी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा सुद्धा नोंदवला होता. संदीप सिंह यांच्याप्रमाणे त्यांच्यावर सुद्धा निलंबनाची टांगती तलवार होती. त्यामुळे कारवाई होण्याआधी ट्रेनसमोर उडी मारुन त्यांनी आपलं जीवन संपवलं अशी शक्यता आहे. दिल्ली पोलिसांनी अजून यावर कुठलही स्टेटमेंट केलेलं नाही. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here