नाशकातून एक धक्कादायक घटना! साडेचार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक

0
371

बदलापुरमध्ये तीन ते सहा वर्षांच्या चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला असतानाच आणखी एका चिमुकलीला नाशिकमध्ये एका नराधमाने क्रूर कृत्याचा बळी बनवले आहे. न्याय मिळवून देण्यासाठी काल अख्खं बदलापूर मंगळवारी रस्त्यावर उतरलं होतं. मध्ये रेल्वे आंदोलकांनी अडवून धरली होती. त्यातच आता नाशकातून अशीच एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

चिमुकली घरासमोर खेळत असताना तिचं अपहरण केलं. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. चिमुकली राहत असलेल्या गावातील एका संशयितानं हे पाशवी कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. नाशिकच्या सिन्नरमध्ये धक्कादायक घटना घडली. सोमवारी संध्याकाळी चिमुकली आपल्या घरासमोर खेळत होती. त्याचवेळी आरोपी चिमुकलीजवळ आला. टिल्लू म्हणून त्याला सगळे ओळखत होते.

त्यानं चिमुकलीचं अपहरण केलं. बराच वेळी चिमुकली आली नाही, त्यामुळे तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. पण चिमुकली कुठेच सापडली नाही. त्याचवेळी चिमुकलीसोबतच हा तरुणही बेपत्ता असल्यानं सर्वांचा संशय बळावला. कुटुंबियांनी तात्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलिसांत चिमुकली बेपत्ता असल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्र तात्काळ हलवण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं. चिमुकलीचं त्यानंच अपहरण केल्याचं पोलिसांना सांगितलं. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेत मुलीची सुटका केली. तर संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here