धक्कादायक! भररस्त्यात पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला, पतीवर गुन्हा दाखल

0
261

गिरगाव परिसरातील खाडिलकर रोड येथे एका पतीने रागाच्या भरात पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली. पत्नीवर वार केल्यानंतर आरोपीने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पोलिसांनी दिली. हा थरार घडल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी गर्दी केली. ( हेही वाचा- उत्तर प्रदेशच्या 17 वर्षीय तरुणीची दिल्लीच्या रेड लाईट भागातून सुटका, बॅडमिंटन चॅम्पियन बनण्यासाठी घरातून गेली होती पळून)

मिळालेल्या माहितीनुसार, शितल बेलोसे (30) असं पत्नीचे नाव आहे. तर सागर बेलोसे (32) असं आरोपीचे नाव आहे. शितल आणि सागर यांच्यात घरगुती वाद सुरु होता. गिरगाव येथील खाडिलकर रोड वर उभी असताना सागरने शितलच्या मानेवर धारदार शस्त्राने हल्ला केला. पत्नीवर हल्ला केल्यानंतर रस्त्यावर एकच खळबळ उडाली. त्यानंतर सागने स्वत: आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मानेवर कटरच्या साहाय्याने हल्ला केल्यानंतर शितल गंभीर जखमी झाली. घटनाची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी दोघांना रुग्णालयात दाखल केले.
हल्लेमागील कारण उघडकीस

सागर आणि शितल यांच काही वर्षापूर्वी लग्न झालं होते. लग्नानंतर दोघे ही विरारला राहायचे. सागरचं दुसऱ्या महिलेसोबत अफेअर सुरु असल्याचे शितलला संशय होता. त्यामुळे ती विरारचे घरं सोडून माहेरी परतली. सागरने तीला अनेकदा फोन करून विरारला येण्यास सांगितले. परंतु शितलने त्याचे एक ऐकले नाही. याच गोष्टीचा राग मनात धरत शितलवर कटरच्या सहाय्याने हल्ला करण्यात आला. त्यानंतर सागरने स्वत:ला संपवण्याचे प्रयत्न केले. परंतु स्थानिकांच्या मदतीने त्याला आत्महत्या करण्यापासून रोखले.

आरोपीवर गुन्हा दाखल

घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळावरून दोघांना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपी सागरवर हत्तेचा गुन्हा (कलम १०९) दाखल केला. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here