भारतासाठी वाईट बातमी! भारताची कट्टर दुश्मन असलेल्या खालिदा झिया बांगलादेशच्या पंतप्रधानपदी बसणार?

0
385

राखीव जागांच्या मुद्द्यावरुन बांगलादेशमधील हिंसक निदर्शनांची धग इतकी वाढली की सोमवारी पंतप्रधान शेख हसीना यांना पदाचा राजीनामा देऊन तातडीने देश सोडावा लागला. यानंतर भारताकडे पलायन करण्याची वेळ शेख हसीना यांच्यावर आली. शेख हसीना यांनी ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागितला आहे. मात्र लंडनमधून त्यांना नकार आल्याची माहिती आहे. बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाने उग्र रुप धारण केलं असून त्याची परिणती आता हिंसाचारामध्ये झाली आहे. या आंदोलनात आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी शेख हसीना यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती दिली. तसेच अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरल्यानंतर नजरकैदेत असलेल्या माजी पंतप्रधान खालिदा झिया (Khaleda Zia) यांची सुटका करण्याचे आदेशही त्यांनी दिले. मोहम्मद शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त करून अंतरिम सरकार स्थापन करण्याची घोषणाही केली आहे. शेख हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी खालिदा झिया यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावल्यानंतर 2018 मध्ये तुरुंगात टाकण्यात आले होते. बांगलादेशच्या नव्या सरकारमध्ये खालिदा झिया पुन्हा पंतप्रधान होतील, असे मानले जात आहे.

खालिदा झिया कोण आहेत?
खलिदा झिया या प्रमुख विरोधी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या (बीएनपी) प्रमुख आहेत. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1945 रोजी बंगालमधील जलपाईगुडी येथे झाला. 1977 ते 1981 पर्यंत बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष राहिलेले त्यांचे पती झियाउर रहमान यांच्या हत्येनंतर खालिदा झिया यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यांनी 1978 मध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली. 1991 मध्ये त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. पाकिस्तानच्या बेनझीर भुट्टो यांच्यानंतर त्या मुस्लिम जगताच्या दुसऱ्या महिला पंतप्रधान बनल्या.

भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप-
2001 ते 2006 या त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही खालिदा झिया पंतप्रधान होत्या. 2006 मध्ये त्यांच्या सरकारचा कार्यकाळ संपल्यानंतर, जानेवारी 2007 मधील निवडणुका राजकीय हिंसाचार आणि भांडणामुळे पुढे ढकलण्यात आल्या, ज्यामुळे लष्कराने काळजीवाहू सरकारचा ताबा घेतला. आपल्या अंतरिम राजवटीत काळजीवाहू सरकारने खालिदा झिया आणि त्यांच्या दोन मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. खालिदा झिया सध्या विविध आरोग्य समस्यांनी त्रस्त आहे, त्यामुळे त्या अनेकदा वैद्यकीय सेवेसाठी परदेशात जातात.

भारतासाठी वाईट बातमी-
बांगलादेशातील शेख हसीना सत्तेतून बाहेर पडणे ही भारतासाठी चांगली बातमी नाही. कारण खालिदा झिया यांच्या काळात भारतासोबत अनेक प्रकारचे तणाव निर्माण झाले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की खालिदा झिया यांचा कल पाकिस्तानकडे आहे आणि त्यांचा पक्ष बीएनपी कट्टरवाद्यांनी भरलेला आहे जो भारतासाठी एक समस्या आहे. फर्स्ट पोस्टच्या रिपोर्टनुसार, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे मनीष दाभाडे म्हणतात, ‘विरोधी नेत्या खालिदा झिया यांच्या बीएनपी आणि जमात-ए-इस्लामीचे कट्टरपंथी आणि इस्लामवादी भारतासाठी मुख्य समस्या आहेत. त्याने बांगलादेशातील निदर्शने हायजॅक केली होती आणि भविष्यातील कोणतेही सरकार ज्यामध्ये त्याचा समावेश असेल तो भारतासाठी एक समस्या असेल. कारण हे सरकार चीन आणि पाकिस्तान समर्थक असल्याची शक्यता आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here