राज्यात विकृत नराधमांचे हे प्रकार वाढतच चालले असून संपूर्ण महाराष्ट्रातच संतापाची लाट उसळली आहे. लहान मुलींनाही हे नराधम सोडत नाहीत. हे सगळं कमी की काय म्हणून आता मुंबईतून पुन्हा असाच एक संतापजनक आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इमारतीच्या सुरक्षारक्षकानेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारा केल्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. रक्षकच भक्षक बनल्याची ही धक्कादायक घटना ओशिवरा परिसरात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 17 वर्षांची असून इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेच तिच्या अत्याचार केला आहे. तो तिला जबरदस्ती बाथरूममध्ये घेऊन गेला आणि तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी तक्रार नोंदवण्यात आल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी बलात्कार आणि बालकांचं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर पोलिसांनी 37 वर्षांच्या आरोपी सुरक्षारक्षकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.