डेट करण तरुणाला पडल महागात,दोन तासाच्या डेटसाठी भरले चक्क 60 हजारांचे बील

0
728
डेटींग अॅपच्या माध्यमातून साथीदार शोधतात आणि भेटीगाठी करतात. मात्र अशीच एक डेट मुंबईतील तरुणाला महागात पडली आहे. टिंडर या डेटिंग ॲपवर ओळख झालेल्या तरुणीने मित्रांच्या मदतीने तरुणांला जवळपास लाखांना गंडवल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला गोड गोड बोलणारी डेट नंतर त्या तरुणांचा चांगलाच खीसा खाली करते. हे दाखवणारी एक घटना नुकतीच मुंबईत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
दीपिक नारायण भारद्वाज यांनी त्यांच्या X अकाऊंट वर बिलांचे काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टनंतर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. भारद्वाज यांच्या पोस्टनुसार, Tinder, Bumble, Hinge आणि OKCupid सारख्या लोकप्रिय डेटिंग ॲप्सवर हे घोटाळे झाले आहेत. या तरूणांनी अशा डेटसोबत संपर्क साधला ज्या त्वरीत भेटण्यात स्वारस्य दाखवतात. अनेकदा गॉडफादर क्लब किंवा आसपासच्या हॉटेल्सवर जातात. त्यानंतर महागडे पेय आणि खाण्याच्या गोष्टी मागवतात. ते झाल्यानंतर बिल ऑर्डर केलेल्या वस्तूपेक्षा जास्त येते. त्यात तरूणाने पैसे देण्यास नकार देतातच क्लबचे कर्मचारी किंवा बाउंसर त्यांना धमकावतात आणि अपमानीत करतात. त्यामुळे तरूणांना बिल भरावे लागते.
दिल्ली, गुरुग्राम, बेंगळुरू तसेच हैदराबाद यासारख्या प्रमुख शहरांमध्येही अशाच घटना घडल्या आहेत. जूनमध्ये, एका तरुणाची तबेबल 1.2 लाख फसवणूक झाली होती. तेव्हा त्याला चाकूचा धाक दाखवूण बिल भऱण्यास भाग पाडले होते. सध्या मुंबई अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे.
मात्र टिंडर ॲपवर ओळख झालेल्या तरुणीचा नंतर नंबर देखील लागत नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे ध्यानात येताच काही तरुणांनी मुंबई पोलिसांच्या संकेतस्थळावर या संदर्भात तक्रारी नोंदवल्या आहेत. सध्या याप्रकरणी आंबोली पोलिसांकडून ते ॲप कोण ऑपरेट करत आहे त्यात कोणकोणत्या मुली सहभागी आहेत आणि हॉटेलचा नेमका रोल काय याचा तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here