धक्कादायक! 5 वर्षाच्या मुलीचा 10 रुपयांचा मँगो ज्यूस प्यायल्याने मृत्यू

0
323

तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई जिल्ह्यातील कनिका इलुप्पई गावात 10 ऑगस्ट 2024 रोजी ही घटना घडली. आर. काव्याश्री असे मृत मुलीचे नाव आहे. 10 रुपयांचा मँगो ज्यूस(Mango Juice ) प्यायल्याने 5 वर्षांच्या मुलीचा मृत्यू (Minor Dies)झाला. ज्यूस प्यायल्यानंतर काही वेळातच तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला तातडीने कांचीपुरम सरकारी जिल्हा मुख्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तिला चेंगलपेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात हलवण्यात आले, तेथे तिचा मृत्यू झाला. या घटनेनंतर अन्न सुरक्षा विभाग खडबडून जागे झाले आहे. दुसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मंगळवारी, 13 ऑगस्ट 2024 रोजी सार्वजनिक आरोग्य आणि प्रतिबंधात्मक औषध संचालनालयाने गावात घरोघरी जाऊन तपासणी करण्यासाठी आरोग्य पथके तैनात केली. प्रत्येक टीममध्ये डॉक्टर, एक परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश आहे. दूषित घटकांची चाचणी घेण्यासाठी त्यांनी मुख्य पाण्याच्या पाइपलाइन आणि ओव्हरहेड टाक्यांमधून पाण्याचे नमुने देखील गोळा केले आहेत.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, चेय्यरमधील आरोग्य सेवा उपसंचालक के. सतीश म्हणाले की,’आम्ही गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करत आहोत. आतापर्यंत उलट्या, ताप आणि जुलाब अशी प्रकरणे आढळून आलेली नाहीत. मात्र, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.’

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here