श्रद्धा वाळकर सारख्या हत्याकांडाची पुनरावृत्ती भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेंगळुरूमध्ये झाली आहे. फ्रिज मध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे आढळले आहे. महिलेचा मृतदेह चार ते पाच दिवसांचा असल्याचे सांगण्यात येत आहे. या महिलेची हत्या कधी, कोणी आणि का केली याचा शोध घेण्यासाठी सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहेत. सध्या महिलेच्या मृतदेहाचे शवविच्छेदनासाठी पाठविले आहे.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची आठ विशेष पथके तयार केली आहे. महिलेचे सीडीआर स्कॅनही केले जात आहे. ओळखीच्या व्यक्तीने हा प्रकार केला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. बेंगळुरूच्या वायलीकवल पोलीस स्टेशन हद्दीतील वीराण्णा रोडवरील एका घरातून महिलेच्या मृतदेहाचे तुकडे सापडले आहेत. महिलेच्या मृतदेहाचे तीस तुकडे करून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवण्यात आले होते.
दुर्गंधी आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाचा तपास सुरु केला. ही महिला मूळची नेपाळची असून अनेक वर्षांपासून ती बंगळुरूमध्ये एकटीच राहत होती. तिचा नवरा बेंगळुरुजवळील एका आश्रम मध्ये काम करत होता.महिलेच्या मृतदेहाचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीने हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहे.