
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टीका केली आहे. अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे, ‘मला पहा आणि फुल वहा’ या स्वरुपाचा होता असा टोला सपकाळ यांनी लगावला आहे. मुंबई तरंगली आहे महायुतीचा भ्रष्टाचार उघड झाला आहे. भाजपला उतरती कळा लागल्याचे सपकाळ म्हणाले. तसेच महाराष्ट्राचे निर्णय अमित शाह घेत आहेत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत नाहीत अशी टीका देखील सपकाळ यांनी केली.
महाराष्ट्र केसरी लढवणार माणूस गाव गाड्यात कुस्त्या लढत आहे असे म्हणत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अशोक चव्हाण यांना टोला लगावला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका प्रदेश कमिटीने जे काही अधिकार दिलेले आहेत ते स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. स्थानिकची जी काही परिस्थिती आहे ती पाहून सुद्धा निर्णय घ्या असे सपकाळ म्हणाले. तसेच महाराष्ट्र अमित शाह चालवत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कटपुतली आहेत. अमित शाह यांचा महाराष्ट्र दौरा म्हणजे मला पहा आणि फुल वहा या स्वरूपाचा असल्याचे सपकाळ म्हणाले.