सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा; काँग्रेस नेत्यांचे आवाहन

0
85

माणदेश एक्सप्रेस न्युज
अमरावती: काँग्रेसमधील युवा नेते आणि अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांनी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसच्या भविष्याबद्दल चिंता व्यक्त करत काँग्रेस हा देशातील विचार आहे, तो संपणार नाही असे सत्यजित तांबे यांनी म्हटलं. मात्र, राहुल गांधी काँग्रेस नेत्यांना देखील सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, राहुल गांधी अॅक्सेसेबल नाहीत असे म्हणत एका मुलाखतीत तांबे यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरच टीका केली होती. त्यावरुन, आता काँग्रेस नेत्यांकडून सत्यजित तांबेंना प्रत्त्युतर दिलं जात आहे. माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी राहुल गांधींबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन सत्यजित तांबेना सवाल केले आहेत. तसेच, तांबे यांनाही मोदींच्या भेटीचं चॅलेंज दिलं आहे.

 

सत्यजित तांबे हे काँग्रेसचे आहेत आणि आता ते अपक्ष निवडून आले आहेत. त्यामुळे, सत्यजित तांब्यांनी मोदींना फोन लावावा, याशिवाय महाराष्ट्रातल्या कोणीही मोदींना फोन करावा. मोदीजींनी तासाभरात कुणाला अपॉइंटमेंट दिली तर मग आम्ही पण तसंच बोलू शकतो, असे म्हणत काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सत्यजित तांबेंना प्रति चॅलेंज दिलं आहे. राहुल गांधी सर्वसामान्यांमध्ये मिसळतात, भेट देतात. प्रत्येक पक्षाचा आपापला प्रोटोकॉल असतो, तो प्रोटोकॉल फॉलो केला जातो. राहुल गांधी सर्वसामान्यांना भेटतात, बोलतात आणि समन्वयक देखील करतात, असेही यशोमती ठाकूर यांनी म्हटलं. ज्यांनी पक्ष सोडायचा विचार केला, अलिप्त राहण्याचा विचार केला त्यांना पक्षावर बोलण्याचा अधिकार नाही, असे म्हणत सत्यजित तांबे यांच्यावर जोरदार टीका देखील केली.

 

राहुल गांधी यांना धमकी देणं सोपं नाही, असं कोणीही वायफळगिरी करत असेल तर खबरदारी आम्हाला घेता येते. आम्ही शांततेने वागणारी आणि अहिंसेची मंडळी आहोत. पण, आता कलयुग आहे, आम्हालाही कलयुगासारखं वागता येते, असे म्हणत राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्यालाही यशोमती ठाकूर यांनी इशारा दिला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here