
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरबद्दल सध्या मनोरंजनविश्वात जोरदार चर्चा सुरू आहे. याचं कारण त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला देवा हा सिनेमा ठरलाय. काल ३१ जानेवारीला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. शाहिद कपूर या सिनेमात देव आंब्रे नावाच्या एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळतोय. त्याचबरोबर अभिनेत्री पूजा हेगडेने सुद्धा त्याला सुरेख साथ दिली आहे. पूजा हेगडे ‘देवा’ मध्ये एका महिला पत्रकाराच्या भूमिकेत दिसते आहे.अॅेक्शन, थ्रिलर आणि ‘सस्पेन्स’ ने खिळवून ठेवणारा असा हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. दरम्यान, प्रदर्शित झाल्यापासूनच पहिल्याच दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली ओपनिंग केली आहे.
‘देवा’ हा सिनेमा पहिल्याच दिवशी जवळपास ७ कोटींच्या आसपास कमाई करेल, असा अंदाज अनेकांनी लावला. पण या चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईचे आकडे पाहता प्रेक्षकांचा फार चांगला प्रतिसाद मिळालेला दिसत नाही.
‘देवा’ सिनेमाचं पहिल्या दिवसाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन ५ कोटी रुपये इतकं आहे. परंतु या आकड्यांमध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. ५० कोटी रुपयांचे बजेट असलेल्या या चित्रपटाची ओपनिंग खूपच संथ आहे. त्यामुळे हा चित्रपट वीकेंडला किती कमाई करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
रोशन एंड्र्यूज यांनी ‘देवा’ सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात शाहिदची आजवरची सर्वात वेगळी आणि भन्नाट भूमिका आहे. एकंदरीत व्यवस्थेला न जुमानणारा पोलीस अधिकारी आपल्या मर्जीचा मालक, अशी त्याची स्वभाव वैशिष्ट्ये आहेत.