
माणदेश एक्स्प्रेस/आटपाडी: आटपाडी महसूल विभागाने अवैध वाळू तस्करीवर मोठी कारवाई करत माणगंगा नदीपात्राच्या शेजारील बोंबेवाडी गावात ७० ब्रास वाळू जप्त केली आहे. जिल्हाधिकारी अशोक काकडे, प्रांताधिकारी डॉ.विक्रम बांदल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतःतहसीलदार सागर ढवळे व महसूल पथकाने ही धडक कारवाई केली.
या मोहिमेत , विनायक पाटील, अरुण ऐनापुरे तसेच कोतवाल गोरख जाविर ,पोलीस पाटील वैभव देशमुख , संतोष ऐवळे , प्रभाकर पूजारी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. गुप्त माहितीच्या आधारे महसूल पथकाने वाळू तस्करी करणाऱ्या ठिकाणी छापा टाकत सदर वाळू जप्त केली.