माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायत येथे सांगली जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी नगरपंचायत सीओ यांच्यासह कर्मचारी यांना विविध प्रश्नावर धारेवर धरले.
यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष जयवंत सरगर, बाजार समितीचे माजी संचालक विष्णू अर्जुन, युवा नेते विनायक पाटील, कैलास वाघमारे, चंदू काळे, विकास भुते, आबासो भानवसे यांच्यासह कार्यकर्त उपस्थित होते.
दिनांक २४ रोजी आमदार गोपीचंद पडळकर यांचा आटपाडी येथे नागरी सत्कार कार्यक्रम होता. यावेळी त्यांची आटपाडी बस स्थानकपासून रॅली निघाली होती. सदरची रॅली आटपाडी बाजार पटांगण येथील नगरपंचायत समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आली होती.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करण्यास गेले असता, यावेळी स्ट्रीट लाईट बंद झाली होती. याबाबत आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी जाहीर सभेत वक्तव्य केले होते.
याच मुद्यावरून धरून ब्रम्हानंद पडळकर (Brmhanand Padalkar) यांनी आज आटपाडी नगरपंचायत येथे बैठक घेतली. यावेळी त्यांनी सीओ हजारे यांच्या बरोबर एमएसईबीचे अधिकारी संजय बालटे यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत, कर्मचारी यांना धारेवर धरत, काम करत असताना जर राजकारण आणाल, तर गाठ ब्रम्हानंद पडळकर यांच्याशी असल्याचा इशारा देखील दिला आहे.