माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका ह्या राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लढविण्यात येणार असल्याची विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आटपाडी येथे पत्रकार परिषदेत केले.
यावेळी पत्रकार परिषदेला आटपाडी बाजार समितीचे संचालक, हणमंतराव पाटील, जिल्हा दुध संघाचे मा.चेअरमन विष्णुपंत चव्हाण-पाटील, दिलीप नांगरे-पाटील, सुरज पाटील, सुनील लेंगरे, डॉ. तुषार पवार, अश्विन नांगरे-पाटील, अनिता पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना पाटील म्हणाले, चांगली विचारधारा असलेला पक्षाची उमेदवारी व महाविकास आघाडीला राज्यात असलेले पूरक वातावरण होते. तसेच माझे आजोबा, वडील यांनी मतदार संघात असलेले काम यामुळे आम्हाला विजयाची मोठी संधी होती. परंतु समोरच्या उमेदवाराचा विजय हा साम.दाम, दंड, भेद याबरोबरच EVM मुळे त्यांना विजय मिळविता आला आहे. त्यामुळे सामान्य कार्यकर्त्यांनी निवडणुका लढवायच्या का? नाही असा सवाल निर्माण होत आहे.
परंतु या निकालाने आम्ही खचलो नसून, पुन्हा उभारी घेणार आहोत. आटपाडी तालुक्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या पूर्ण ताकदीने लढविणार असून, मतदार संघातील आरोग्य, पाणी, दळणवळण याबरोबरच युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या पाहिजेत यावर काम करणार असल्याचे वैभव पाटील म्हणाले.