आताच्या आता ‘हा’ नंबर सेव्ह करा मोबाईलमध्ये,कधी पण पडू शकते गरज, कशासाठी कराल वापर

0
336

 

गतीने डिजिटल इंडिया होणाऱ्या भारतात ऑनलाईन स्कॅम, फ्रॉड, फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. सायबर भामटे ग्राहकांना गंडा घालण्यासाठी युक्त्या वापरत आहेत. सर्वसामान्य लोकांना फसवण्यासाठी ते जाळे टाकतात. त्यांच्या कष्टाचा पैसा अवघ्या काही मिनिटात उडवतात. सायबर फसवणूक ही केवळ सर्वसामान्यांसाठीच नाही तर सरकारसाठी पण मोठी डोकेदुखी ठरली आहे. केंद्र सरकार ते राज्य सरकार आणि रिझर्व्ह बँके ते तुमची बँक सर्वच जण ऑनलाईन फसवणूक होऊ नये यासाठी प्रबोधन करत आहेत.

सायबर फसवणुकीच्या घटना पाहिल्या असता, या भामट्यांच्या मायाजालात केवळ छोट्या शहरातील, गावाकडील लोक अडकल्याचा दावा पण फोल असल्याचे दिसून येते. या मालाजालात बडे अधिकारी, बडे बाबू, नेते, पुढारी, प्रशासकीय अधिकारी, पोलीस सुद्धा अडकल्याचे दिसून येईल. त्यांना फसवण्याची युक्ती थोडी वेगळी असते इतकेच. या भामट्यांपासून लोकांना सावध करण्यासाठी आणि त्यांच्या झटपट पाठलागासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने एक हेल्पलाईन क्रमांक दिला आहे. सायबर गुन्हे प्रकरणात नागरीक 1930 हा क्रमांक डायल करु शकतात. अथवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकतात.

मोबाईलमध्ये लागलीच करा सेव्ह क्रमांक

सध्या वाढते ऑनलाईन प्रकरण पाहता 1930 हा एक महत्वपूर्ण मदत क्रमांक ठरु शकतो. हा क्रमांक तातडीने तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करुन ठेवा. ज्यावेळी तुम्हाला गरज पडेल. त्यावेळी हा क्रमांक डायल करा. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हे काम केले. तर तुम्हाला लवकर मदत मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here