पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात , एक ठार, 3 जखमी (Watch Video)

0
415

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर मागून येणाऱ्या डंपर ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या चारचाकीला वाहनाला धडक दिली. या अपघातात एक जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. महामार्गावरील सीसीटीव्हीमध्ये हा अपघात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार 21 ऑगस्ट रोजी हा अपघात झालाव्हिडिओमध्ये अपघातावेळी ट्रक भरधाव वेगाने जात असल्याचं दिसत आहे. या अपघातात एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक डंपर ट्रक भरधाव वेगाने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या चारचाकीकडे जाताना दिसत आहे. पांढऱ्या रंगाचे कपडे घातलेला आणि वाहनाजवळ इतरांसोबत उभा असलेला एक व्यक्ती जवळ येत असलेल्या ट्रकची दखल घेऊन पटकन पळून जातो. परंतु, काही सेकंदातच ट्रक पांढऱ्या कारला येऊन धडकतो. यामुळे गाडीच्या बोनेटसमोर उभ्या असलेल्या तीन लोकांनाही डंपरची धडक बसते. हा अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी जमली होती.

पुणे-सोलापूर महामार्गावरील वल्हारी गावात अपघात –
पुणे-सोलापूर महामार्गावरील वल्हारी गावात हा अपघात झाला. कारमधील प्रवासी पुण्याहून अक्कलकोट यात्रेला जात होते. मात्र वाटेत कारचे इंजिन बिघडल्याने त्यांनी कार थांबवून रस्त्याच्या कडेला उभी केली. या अपघाताबाबत यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पहा व्हिडीओ:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here