इंदूरमध्ये NOTA बटणाने मोडला विक्रम; तब्बल ‘इतक्या’ लाख लोकांनी दिली नोटाला मते

0
8

देशभरात लोकसभा निवडणुकीचे सात टप्पे संपल्यानंतर आज मतमोजणी सुरू आहे. अशात मध्य प्रदेशातील इंदूरची जागा एका वेगळ्या कारणाने चर्चेत आली आहे. या ठिकाणी नोटा (NOTA) ला आतापर्यंत सर्वाधिक मते मिळाली आहेत. यासह इंदूरमधील ‘नोटा’ने बिहारमधील गोपालगंजचा पूर्वीचा विक्रम मोडला आहे. इंदूरमध्ये आतापर्यंत नोटाला 1,96,903 मते मिळाली आहेत. अशाप्रकारे यावेळी इंदूरने देशातील सर्वाधिक नोटाचा विक्रम केला आहे. याआधी बिहारच्या गोपालगंज जागेवर 2019 च्या निवडणुकीत 51,660 नोटा मते मिळाली होती.

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सप्टेंबर 2013 मध्ये इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये ‘NOTA’ बटण समाविष्ट करण्यात आले होते. इंदूर जागेबाबत बोलायचे झाल्यास, इथे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार शंकर लालवानी आघाडीवर आहेत. इंदूरमधील काँग्रेसचे घोषित उमेदवार अक्षय कांती बम यांनी, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेला, 29 एप्रिल रोजी आपला अर्ज मागे घेतला. यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला. त्यानंतर लगेचच अक्षय कांती बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे या जागेच्या 72 वर्षांच्या इतिहासात काँग्रेस प्रथमच निवडणुकीच्या शर्यतीतून बाहेर पडली. यानंतर काँग्रेसने स्थानिक मतदारांना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर (EVM) ‘नोटा’ बटण दाबून भाजपला धडा शिकवण्याचे आवाहन केले.

पहा पोस्ट:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here