ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकारण

साताऱ्यामध्ये, उदयनराजे भावूक; जलमंदिर पॅलेसबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष

राज्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या लोकसभा मतदारसंघात सातारा मतदारसंघाचा समावेश आहे. इथं उदयनराजेंनी शशिकांत शिंदे यांना पिछाडीवर टाकत आघाडी मिळवली आहे. त्यादरम्यान, उदयनराजे भावूक झाले. त्याच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहून लागल्या. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कार्यकर्त्यांची मोठी गर्दी त्यांच्या घराबाहेर दिसत आहे.

 

लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये पराभव पत्करावा लागल्यानंतर आता पुन्हा एकदा साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनी निवडणूकीसाठी उभे राहिले आहेत. यंदाच्या सातारा लोकसभा मतदारसंघात काँटे की टक्कर पाहायला मिळत काही. मतमोजणीला सुरूवात झाल्यापासून दोन्ही उमेदवार कधी आघाडीवर तर कधी पिछाडीवर दिसत होते. मात्र, 14 व्या फेरीत उदयनराजेंनी मुसंडी घेत शशिकांत शिंदेंना मागे टाकलं. उदयनराजे 14 व्या फेरीत 4000 मतांनी आघाडी घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी जलमंदिर पॅलेसवर जाऊन मोठा जल्लोष केला. कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहून, उदयनराजे भावूक झाल्याच दिसलं. उदयनराजेंचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

पंधराव्या फेरीतील निकाल

नुकतेच हाती आलेल्या पंधराव्या फेरी अखेर उदयनराजे भोसले यांना 9,736 मतांनी आघाडी मिळाली आहे. शशिकांत शिंदें पिछाडीवर पडले असून उदयनराजेंना 4,79,304 मतं मिळाली आहेत. तर, शशिकांत शिंदेंना 4,69,568 मत मिळाली आहे. दोन्ही उमेदवारांच्या मतांमध्ये 9,736 मतांचा फरक आहे. अद्यापही काही फेऱ्या बाकी आहेत. मात्र, तत्पूर्वीच जलमंदिर पॅलेसवर कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात एकूण सरासरी 63.16 टक्के मतदान झाले. साताऱ्यात 11 लाख 93 हजार 492 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

पत्नी दमयंतीराजे भोसले यांची प्रेमाची मिठी

कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून उदयनराजे भावूक झाले. त्यावेळी त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले ह्याही उदयनराजेंसोबत उपस्थित होत्या. त्यांनी उदयनराजेंना प्रेमाने मिठी मारली, तर कार्यकर्त्यांनीही जल्लोष केला. त्यामुळे, उदयनराजे अतिशय भावूक झाले होते, त्यांनी कार्यकर्त्यांना हात जोडून आभार मानले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button