‘काही हरकत नाही…’अर्शद नदीमच्या विजयावर नीरजच्या आईच भावनिक उत्तर

0
138

तमाम भारतीयांना काल सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. सुवर्ण पदक भारतालाच मिळणार हा विश्वास अनेकांना होता. त्या विश्वासमागचं कारणही अर्थात तसच होतं, नीरज चोप्रा. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल मिळवल्यानंतर नीरज चोप्राने कधी मागे वळून बघितलं नाही. त्याने देशो-देशीच्या अनेक स्पर्धा जिंकल्या. नवे रेकॉर्ड बनवले. त्यामुळेच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा नीरज हमखास मेडल जिंकणार असा कोट्यवधी भारतीयांना विश्वास होता. तो त्याने सार्थ देखील ठरवला. फक्त यावेळी नीरज चोप्राला पदकाचा तो रंग कायम राखता आला नाही. सोनेरी ऐवजी यावेळी चांदीच्या पदकावर नीरज चोप्राला समाधान मानाव लागलं. नीरजने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुद्धा दमदार प्रदर्शन केलं. क्वालिफिकेशन राऊंडमध्येच तो पहिल्या स्थानावर होता.

फक्त फायनलमध्ये नीरजला त्याचं अव्वल स्थान कायम राखता आलं नाही. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने तिथे बाजी मारली. अर्शद नदीमने 92.97 मीटर अंतरावर जॅवलिन म्हणजे भालाफेक करुन सुवर्ण पदक मिळवलं. सोबत नवीन ऑलिम्पिक रेकॉर्ड रचला. आपल्या या प्रदर्शनाने अर्शद नदीमने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण अर्शद नदीम इतक्या दूरवर थ्रो करेल याची कोणालाच कल्पना नव्हती. नीरजने फायनलमध्ये 89.45 मीटर अंतरापर्यंत थ्रो केला. रौप्य पदक विजेती कामगिरी केल्यानंतर नीरजने अजून आपलं सर्वोत्तम प्रदर्शन बाकी असल्याच सांगितलं. “ज्यावेळी मी पूर्णपणे फिट असेन तेव्हा निश्चित सर्वोत्तम कामगिरी करेन” असं नीरज म्हणाला.

नीरजच्या आईच मन जिंकणारं उत्तर

नीरज पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दुखापतीसह खेळत होता. त्याला ग्रोइन इंजरी झालेली. जॅवलिनच्या थ्रो च्या फायनलनंतर नीरज चोप्राने हा खुलासा केला. नीरज चोप्राच्या आईने सुद्धा सांगितलं की, ‘तो दुखापतीसह खेळत होता’ ‘माझ्यासाठी रौप्य सुद्धा सुवर्ण पदकासारखच आहे’ असं नीरजची आई म्हणाली. नीरजच्या आईने यावेळी मन जिंकणार उत्तर दिलं. नीरजच्या आईला पाकिस्तानच्या अर्शद नदीमच्या गोल्ड मेडल जिंकण्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर त्या म्हणाल्या की, ‘काही हरकत नाही, तो सुद्धा आपलाच मुलगा आहे’. नीरज घरी आल्यानंतर त्याच्यासाठी त्याच्या आवडीचे पदार्थ बनवणार असल्याच त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here