जब यमराज जी छुट्टी पर हों तो ऐसा होता है… दारूच्या नशेत रुळांवर झोपला होता व्यक्ती, घटनेचा व्हिडिओ पाहून व्हाल चकित

0
361

अंगावरून ट्रेन गेली, रेल्वेखाली आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये समोर आली आहे. यानंतर पोलीसही आश्चर्यचकित झाले आहेत. वास्तविक, एक व्यक्ती दारूच्या नशेत रेल्वे रुळांवर झोपला होता. त्याला कोणीतरी पाहिले आणि एका व्यक्तीने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. मात्र पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर ती व्यक्ती जिवंत असल्याचे पाहून ते चक्रावून गेले. तरुण दारूच्या नशेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन त्याच्या अंगावरून गेली, मात्र तो बचावला.

घटनेनंतर पोलिसांनी व्यक्तीच्या कुटुंबीयांना माहिती दिली आणि त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती हरियाणातील एका हॉटेलमध्ये काम करते. अमर बहादूर असे या व्यक्तीचे नाव असून तो नेपाळचा रहिवासी आहे. बिजनौरमधील सेंट मेरीजच्या रेल्वे गेटजवळ पोलिसांना हा व्यक्ती सापडला होता.

ट्विटरवर @SachinGuptaUP नावाच्या हँडलवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर लोक जोरदार कमेंट करत आहेत. एकाने लिहिले, ‘कोणीही नशा करू नये’, दुसऱ्याने लिहिले, ‘नशीब असे असेल की मृत्यूही येतो आणि जातो.

व्हिडिओ पहा:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here