Ghatkopar hoarding incident : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला ; ‘एनडीआरएफ’नं दिली माहिती

0
2

मुंबईला सोमवारी (13 मे) दुपारनंतर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं जोरदार तडाखा दिला. दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळलं. त्याखाली 88 जण अडकले होते. यामध्ये 74 जणांना वाचवण्यात यश आलं असून 14 जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती ‘एनडीआरएफ’नं दिली आहे.

घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर होर्डिंग फाउंडेशनसह उखडून पडलं. होर्डिंग तकलादू पद्धतीनं लावल्यानं निष्काजीपणाचे मुंबईकर बळी ठरले आहेत. होर्डिंग आणि पंपाचे छत एकत्रितपणे कोसळल्यानं त्याखाली वाहनं दबली गेली. दुर्घटना एवढी मोठी होती की ‘एनडीआरफ’च्या जवानानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा जाहीरात कंपनीचे संचालक भावेश भिडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. जखमींना घाटकोपरमधील राजावाडी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत सरकारनं जाहीर केलीय तर, जमखींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here