ताज्या बातम्यामहाराष्ट्र

आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस…, काय सांगते तुमची राशी…

मेष :  तुमच्या मार्गदर्शनाखाली मुले काही विशेष यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत मनोरंजनात वेळ व्यतित कराल. आळशीपणामुळे कामाकडे दुर्लक्ष होण्यासची शक्युता आहे. याचा आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. हुशारीने आणि सावधपणे वागण्याची वेळ आहे. कार्यक्षेत्रातील रखडलेल्या कामांना वेग येईल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. प्रकृती चांगली राहिल.

वृषभ : इतरांच्या म्हणण्याकडे लक्ष देण्याऐवजी आपल्या कार्यक्षमतेवर आणि आत्म-शक्तीवर विश्वास ठेवून पुढे जा. तुमच्या जवळच्या मित्रांशी आणि संपर्कांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. काळ अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व राहील. जुन्या मित्राच्या भेटीमुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. नकारात्मक वातावरण टाळा.

मिथुन : ज्येष्ठांचा सल्ला ऐका. विद्यार्थी अभ्यास गांभीर्याने घेतील. अतिखर्चामुळे तणाव असू शकतो. दुपारनंतर परिस्थिती थोडी प्रतिकूल राहिल. तरुणांनी मौजमजा करण्यापेक्षा आपल्या करिअर आणि भविष्याच्या नियोजनावर भर देण्याची गरज आहे. करिअर आणि कार्यक्षेत्रात सर्वोत्तम काम करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. तुम्हाला शारीरिकदृष्ट्या अशक्तरपणा जाणवेल.

कर्क : आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा, असे श्रीगणेश सांगतात. काहीवेळा घरातील सदस्यांना जास्त हस्तक्षेपामुळे त्रास होऊ शकतो. मुलांकडे दुर्लक्ष करु नका. कार्यक्षेत्रातील सर्व कामे आपल्या देखरेखीखाली केल्यास चांगले होईल. पती-पत्नीचे नाते मधुर होऊ शकते. आरोग्यालच्याी किरकोळ समस्याो जाणवण्यााची शक्यचता.

सिंह: शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम वाटेल. नातं गोड ठेवण्यासाठी तुमचं विशेष योगदान असेल. कोणत्याही सदस्याच्या नकारात्मक बोलण्यामुळे घरातील वातावरणात निराशा होऊ शकते. कौटुंबिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अनावश्यक प्रवास टाळा. कार्यक्षेत्रात व्यावसायिक उदासीनतेची स्थिती असू शकते. पती-पत्नीच्या परस्पर सहकार्यामुळे घरातील वातावरण आनंददायी आणि गोड राहील. आरोग्यााकडे दुर्लक्ष करु नका.

कन्या : तरुण त्यांच्या भविष्याबद्दल अधिक सक्रिय होतील. उत्पन्नाचे नवीन स्रोतही मिळू शकतात. कुटुंबातील समस्या शांतपणे सोडवण्याचा प्रयत्न करा. वाहन किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण खराब झाल्याास मोठा खर्च होऊ शकतो. व्यवसायात सुरू असलेल्या अडचणी दूर होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद अनुभवाल. असंतुलित दिनचर्या आणि आहारामुळे पोट खराब होऊ शकते.

तूळ: विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेशी कार्यात यश मिळू शकते. विवाहितांचे सासरच्या लोकांशी मतभेद होण्याेची शक्य्ता. परिस्थिती संयमाने हाताळा, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होण्याहची शक्याता;. काही वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायाकडे दुर्लक्ष होईल. पती-पत्नी व्यस्ततेमुळे घरात फारसे लक्ष देऊ शकणार नाहीत. मसालेदार अन्न टाळा.

वृश्चिक : आर्थिक व्यकवहारांमधील काही गैरसमजामुळे नुकसान होऊ शकते. त्याचा परिणाम नातेसंबंधांवरही होऊ शकतो. एखाद्याशी वाईट बोलणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. सार्वजनिक व्यवहार, ग्लॅमर इत्यादी व्यवसायात यश मिळेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. अतिकामामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल.

धनु : घरामध्ये नूतनीकरण योजना सुरू करताना वास्तु नियमांचे पालन करा. चुकीच्या कामांवर जास्त खर्च केल्यामुळे मनात काही त्रास होऊ शकतो. तुम्ही कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्या क्षमतेपेक्षा जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करू नका. प्रतिष्ठित लोकांशी संबंध राखणे तुमच्या व्यवसायात फायदेशीर ठरेल. कुटुंबातील सदस्यांचा तुम्हाला पूर्ण पाठिंबा असेल.

मकर : वैयक्तिक आणि सामाजिक कार्यात व्यस्तता राहील. अतिआत्मविश्वास आणि अहंकार या दोषांवर नियंत्रण ठेवा. घरातील ज्येतष्ठांाच्याय सल्यािश्वकडे दुर्लक्ष करु नका. घरातील वातावरण आनंददायी राहिल. रक्तदाब आणि मधुमेहाच्या रुग्णांनी अजिबात गाफील राहू नये.

कुंभ : घरातील एखादी महत्त्वाची गोष्ट सार्वजनिक होऊ शकते याची काळजी घ्या. नकारात्मक काम करणाऱ्या लोकांपासून दूर राहा. क्षमता आणि कौशल्याच्या जोरावर नवीन यश मिळवाल. कुटुंब आणि व्यवसायात योग्य सामंजस्य राखले जाईल. घरातील ज्येष्ठांच्या आरोग्याशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

मीन : तुमच्या कार्यांना नवीन आकार देण्यासाठी अधिक सर्जनशील दृष्टीकोन स्वीकारा. जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केल्यास यश मिळेल. जवळच्या नातेवाईकाच्या वैयक्तिक जीवनात काही अडचणींमुळे चिंता होईल. आर्थिकदृष्ट्या दिवस उत्तम आहे. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतात.

(टीप : वरील माहिती केवळ वाचका पर्यंत पोहचविणे हा उद्देश, यातून माणदेश एक्सप्रेस कोणताही दावा करत नाही, अंधश्रद्धा पसरवत नाही.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button