आटपाडी : “या” ठिकाणी आटपाडी नगरपंचायतीची मुख्य इमारत व्हावी ; अमरसिंह देशमुख यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0
5

माणदेश एक्सप्रेस न्युज : आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी नगरपंचायतीची मुख्य इमारत ही बस स्थानक शेजारी असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी व्हावी. अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री यांच्याकडे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी केली असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली.

आटपाडी ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रुपांतर झाल्यानंतर विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळाली आहे. सध्या आटपाडी शहरामध्ये असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र हे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येत असल्याने ते बंद होणार आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्राची साडे तीन एकर असणारी जागा नगरविकास खात्याकडे वर्ग करून तेथे आटपाडी नगरपंचायतची इमारत निर्माण व्हावी यासाठी मुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अन्य मंत्र्यांना भेटणार असल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, तालुक्याची सर्व शासकीय कार्यालये व कोर्ट हे बायपास रोडवरच वरच आहेत. परिणामी जुनी असलेली आटपाडी व व्यापारी पेठेचे महत्व कमी होऊ लागले आहे. कालांतराने एस टी बसस्थानक हे एस डी डेपोजवळ स्थलांतरित होणार आहे. त्यामुळे पुन्हा आटपाडी बसस्थानक शेजारील व्यापारी पेठेचे महत्व कमी होणार आहे.

जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणारे आरोग्य केंद्र व त्याची साडे तीन एकरची जागा पूर्णतः बंद अवस्थेत राहणार आहे. सध्या नगरपंचायतला स्वतंत्र इमारत नाही. इमारतीची आवश्यकता आहे. व इमारत होत असताना ती शहराच्या मध्यवर्ती भागात व नागरिकांच्या सोयीची असणे गरजेचे आहे. यासाठी आरोग्य केंद्राची जागा योग्य आहे. याबाबत नागरिकांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना भेटून त्यांच्याकडे ही जागा नगरविकास खात्याकडे वर्ग करण्याची मागणी करणार असल्याचे अमरसिंह देशमुख म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here