‘या’ जिल्ह्यातील खासदाराचे निधन, हैदराबादमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

0
399

 

काही दिवसांपूर्वी नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबाद येथील किम्स हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. वसंत चव्हाण यांना श्वास घेण्यास अडचण होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तसेच, त्यांना लो बीपीचाही त्रास होत होता. मध्येच त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना सुरुवातील नांदेड येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं. काही काळ तिथे उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानं वसंच चव्हामांना हैदराबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं. त्यानंतर वसंत चव्हाण यांना उपचारासाठी एअर अॅ्म्ब्युलन्सनं हैद्राबाद येथील रुग्णालयात हलवण्यात आलं.

दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांची कारकीर्द
वसंत चव्हाण खासदार होण्याआधी महाराष्ट्र विधानसभेवर अपक्ष म्हणून निवडून गेले होते. त्यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यांनी 2014 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. याशिवाय मे 2014 मध्ये त्यांची विधानसभेच्या लोकलेखा समितीवर नियुक्ती करण्यात आली होती. ते जनता हायस्कूल आणि अॅाग्रीचे अध्यक्षही होते.

नांदेड जिल्ह्यात 2009 साली नायगाव विधानसभा मतदारसंघाची नव्यानं निर्मिती झाल्यानंतर या मतदारसंघाचे पहिले आमदार वसंतराव चव्हाण ठरले. नांदेडमध्ये अशोक चव्हाण-भास्करराव खतगावकर या नेत्यांविना काँग्रेस जिंकू शकते, हे त्यांनी मोठ्या आश्वासकतेनं सिद्ध करत नांदेडमधील काँग्रेसचे वर्चस्व कायम राखलं. वसंत चव्हाण 1978 साली आपल्या नायगाव या गावचे पहिल्यांदा सरपंच झाले. त्यानंतर त्यांनी जिल्हा परिषदेवरही काम केलं. 2002 साली ते जिल्हा परिषदेवर निवडून आले होते, पण नंतर लगेचच त्यांना राज्य विधान परिषदेवर संधी मिळाली. तिथून पुढे तब्बल 16 वर्ष ते विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात कार्यरत होते. नायगाव या गावात एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी मोठा शैक्षणिक विस्तार केला आहे.

2024 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडे विजय खेचून आणला
काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये अशोक चव्हांनी काँग्रेसला रामराम केला. आणि भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपनं त्यांना राज्यसभेवर घेतलं आणि त्यानंतर भाजपला नांदेड आणि हिंगोली लोकसभा जिंकण्याचा मार्ग मोकळा झाला. भाजपकडून प्रताप पाटील चिखलीकरांना पुन्हा संधी देण्यात आली तर काँग्रेसकडूनवसंतराव चव्हाणांना संधी देण्यात आली. अशोक चव्हाणांचा पाठिंब्यामुळे भाजप नांदेडची जागा सहज जिंकेल अशी चर्चा असताना मतदारांनी मात्र वेगळाच निर्णय घेतल्याचं दिसून आलं. काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपच्या प्रताप चिखलीकरांचा मोठा पराभव केला आणि अशोक चव्हाणांच्या जाण्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस संपली नसल्याचा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here