2 घटस्फोटांनंतर आमिर खान तिसऱ्या लग्नाच्या तयारीत? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

0
324

बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. नुकताच अभिनेत्याची लेक आयरा खान हिचं बॉयफ्रेंड नुपूर शिखरे याच्यासोबत लग्न झालं. आयरा हिच्या लग्नात आमिर याचे दोन्ही कुटुंब उपस्थित होते. आमिर खान याने दोन लग्न केली आहेत. अभिनेत्याचं पहिलं लग्न 18 एप्रिल 1986 मध्ये रिना दत्ता हिच्यासोबत झालं. रिना आणि आमिर यांना दोन मुलं देखील आहे. पण दोघांचं लग्न फार काळ टिकू शकलं नाही. अखेर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये रिना आणि आमिर यांचा घटस्फोट झाला.

आमिर खान याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने दुसरं लग्न किरण राव हिच्यासोबत केलं. लग्नानंतर किरण हिने सरोगोसीच्या माध्यमातून मुलाचं जगात स्वागत केलं. किरण आणि आमिर यांच्या मुलाचं नाव आझाद असं आहे. पण आमिर आणि किरण यांचं लग्न देखील फार काळ टिकलं नाही. 2021 मध्ये दोघांनी घटस्फोटाची घोषणा केली. तेव्हा चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला.

दोन घटस्फोटानंतर आमिर खान आता तिसऱ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत आमिर खान याने तिसऱ्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्या शोमध्ये आमिर याने तिसऱ्या लग्नाबद्दल वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र आमिर खान याच्या तिसऱ्या लग्नाची चर्चा रंगली आहे.

रिया हिने आमिर खान याला तिसरं लग्न करणार का? असा प्रश्न विचारला. यावर अभिनेता म्हणाला, ‘आता मी 59 वर्षांचा आहे… मला नाही वाटत की मी आता तिसरं लग्न करेल. मला कठीण वाटत आहे. सध्याच्या घडीला माझ्या आयुष्यात अनेक नाती आहे. मी पुन्हा एकदा माझ्या कुटुंबाच्या जवळ आलो आहे… मला माझी भावंड, मुलं आहेत. त्यांच्यासोबत मी फार आनंदी आहे… एक उत्तम व्यक्ती होण्याचा आता मी प्रयत्न करत आहे.’ असं देखील अभिनेता म्हणाला.

आमिर खान याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, 2007 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘तारे जमीन पर’ सिनेमाचा सिक्वलमध्ये अभिनेता सध्या व्यस्त आहे. सिनेमाच्या सिक्वलचं नाव ‘सितारे जमीन पर’ असं आहे. सिनेमात अभिनेत्री जिनिलिया डिसूझा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सध्या सर्वत्र ‘सितारे जमीन पर’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. चाहते देखील सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.