फ्रीजचा विजेचा झटका लागल्याने आई आणि मुलीचा जागीच मृत्यू

0
84

फ्रीज उघडताच लागला विजेचा झटका, आई आणि मुलीचा उत्तर प्रदेश मध्ये एक भयंकर घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या देवराया जिल्ह्यामध्ये फ्रीजचा विजेचा झटका लागल्याने आई आणि मुलगी दोघीजणी मृत्युमुखी पडल्या आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 55 वर्षीय महिला फ्रीजमध्ये ठेवलेले आंबे काढण्यासाठी गेल्या. जसा त्यांनी दरवाजा उघडला त्यांना विजेचा जोरदार झटका बसला आईला फ्रीजला चिटकलेले पाहून या महिलेची 30 वर्षीय मुलगी आई ला सोडवायला गेली पण तिला देखील विजेचा जोरदार झटका बसला. काही मिनिटांच्या आत दोघींचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार ही 30 वर्षीय महिला आपल्या छोट्या बहिणीचे लग्न म्हणून माहेरी आली होती. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी परिसरात एकच गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली पण कुटुंबीयांनी पोस्टमोर्टमसाठी नकार दिला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here