दिल्लीत आढळला मंकिपॉक्सचा रुग्ण, रुग्णांची स्क्रिनिंग आणि चाचणी वाढवण्याचा सल्ला

0
86

संपूर्ण जगात सध्या मंकिपॉक्सचा  धोका वाढत आहे. दिल्लीत नुकताच मंकिपॉक्सचा रुग्ण आढळला. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना संशयित आणि पुष्टी झालेल्या मंकिपॉक्स रुग्णांची स्क्रिनिंग आणि चाचणी वाढवण्याचा सल्ला दिला आहे. मंकिपॉक्सचा संभाव्य धोका दूर करण्यासाठी सक्रिय उपाययोजनांचा अवलंब भारत सरकारकडून करण्याचा निर्धार आहे. कोरोना सारख्या महामारीचे दिवस पून्हा उद्धभवू नये हा यामागचा उद्देश आहे.

संक्रमित व्यक्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक विलगीकरण सुविधा असलेली रुग्णालये तयार करताना सरकारने आजाराविषयी चूकिची माहिती पसरून दहशत निर्माण होऊ नये यावर जोर दिला आहे. हा दृष्टिकोन कोविड महामारीदरम्यान वापरल्या जाणाऱ्या सर्वसमावेशक धोरणांना प्रतिबिंबित करतो. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना रुग्णालयांमध्ये विलगीकरण सुविधा तयार करण्याचे आणि संक्रमित व्यक्तींची काळजी घेण्यासाठी संसाधने वाढवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हे निर्देश मंकिपॉक्सचा प्रसार रोखण्यासाठी आहे.

मंत्रालयाने प्रयोगशाळा, क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल आणि संक्रमण नियंत्रण पद्धती यासह मंकिपॉक्सच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे देखील जारी केली आहेत. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांना राज्य आणि जिल्हा या दोन्ही स्तरांवर सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेण्यास सांगितले आहे. ज्यात आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांना, विशेषत: त्वचा आणि एसटीडी दवाखान्यातील कर्मचाऱ्यांना, एमपॉक्सची लक्षणे आणि व्यवस्थापन याबद्दल माहिती देण्याचे काम दिले आहे.

संभाव्य मंकिपॉक्स प्रकरणांना समन्वित आणि प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करण्यासाठी हा सक्रिय दृष्टीकोन ठेवला गेला आहे. अहवालानुसार, नुकतेच दिल्लीत एक संशयित मंकिपॉक्स प्रकरण नोंदवले गेले आहे. ज्यात मंकिपॉक्स प्रकरणांची पुष्टी झालेल्या देशातून परत आलेल्या एका व्यक्तीचा समावेश आहे. रुग्णाला तातडीने रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. संशयित रुग्णाच्या नमुन्यांची चाचणी सुरू आहे.

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here