‘आई मला माफ कर, मी तुला मारल…’ आईचा गळा आवळून हत्या केल्यानंतर मुलाची इन्स्टाग्रामवर स्टोरी

0
442

गुजरातमधील राजकोटमधून मन सुन्न करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या आईची हत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आईची हत्या केल्यानंतर मुलाने इन्स्टाग्रामवर आईसह स्वत:चा फोटो शेअर केला आणि पोस्टमध्ये लिहिलं की, ‘माफ कर आई, मी तुला मारलं, तुझी आठवण येते, ओम शांती.’ राजकोटमधील या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, गुजरातच्या राजकोटमधील एका २१ वर्षीय तरुणाला त्याच्या आईची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडिया टु़डेनी दिलं आहे. दरम्यान, राजकोटमधील युनिव्हर्सिटी रोडवरील भगतसिंह गार्डनर परिसरात ४८ वर्षांच्या ज्योतिबेन गोसाई आणि त्यांचा मुलगा हे राहत होते. ज्योतिबेन यांना मानसिक आजार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे ज्योतिबेन या मुलाबरोबर नेहमी भांडण करत असत. याच दररोजच्या भांडणाला कंटाळून २१ वर्षांच्या निलेश नावाच्या मुलाने आपल्या आईचा गळा आवळून हत्या केली.

या घटनेनंतर आरोपी मुलाने इन्स्टाग्रामवर आईबरोबरील स्वत:चा एक फोटो शेअर करत लिहिलं की, ‘माफ कर आई, मी तुला मारलं, तुझी आठवण येते’, ही घटना घडल्यानंतर शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता आरोपी मुलाने गुन्ह्याची कबुली दिली असल्याची माहिती सांगण्यात आली आहे.

दरम्यान, आरोपी मुलाने आपल्या आईवर आधी चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आईने चाकू हिसकावून घेतला. पण त्यानंतर मुलाने आईचा गळा आवळून खून केला. गेल्या २० वर्षांपासून ज्योतीबेन आणि त्यांचा मुलगा हे दोघेच राहत होते. मात्र, ज्योतिबेन या मागील काही वर्षांपासून मानसिक आजाराने त्रस्त होत्या. त्यामुळे त्यांचे मुलाबरोबर नेहमी वाद होत असत. घटनेच्या दिवशीही मुलगा निलेश आणि आई ज्योतीबेन यांच्यामध्ये वाद झाला होता आणि या वादाचे रुपांतर नंतर हाणामारीत झाले. सध्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून घटनेचा पुढील तपास सुरु असल्याची माहिती सांगण्यात येत आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here