पालघरमध्ये धक्कादायक घटना ! एकाच कुटुंबातील तिघांचा राहत्या घरात आढळला मृतदेह

0
205

पालघर जिल्ह्यातील नेहेरोली गावत एक धक्कादायक घटना घडली आहे. गावात एकाच कुटुंबातीली तीन जणांचा मृतदेह घरात आढळून आला आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कांचन राठोड (६५), त्यांचे पती मुकुंद राठोड (७०) आणि त्यांची अपंग मुलगी संगीता यांचे कुजलेले मृतदेह घरात आढळून आले. वाडा-भिवंडी रोडवरील वाड्यापासून २८ किलोमीटर अंतरावर असलेल्या त्यांच्या घरी मृतदेह आढळून आले. राठोड यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितल्यानंतर ही घटना उघडकीस आली.

स्थानिक पोलिसांना कांचन आणि संगिता यांचा मृतदेह बेडरुमध्ये आढळला तर मुकुंद यांचा मृतदेह बाथरूमध्ये सापडला. तिघांची हत्या झाल्याचे पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे.पोलिसांनी या प्रकरणी आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. हे राठोड कुटुंब कामानिमित्त वसई येथे राहायचे. मृत्यूचे नेमके कारण अद्याप निश्चित झालेले नाही. या प्रकरणाचा छडा लावून सत्य उघडकीस आणण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले. हत्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here