
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य बाजार आवार मार्केट यार्ड आटपाडी येथे बाजार समिती व कृषि पणन मंडळ, पुणे यांचे संयुक्त विद्यमानाने दिनांक ०२ ते ०६ मे अखेर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी दिली.
तालुक्यातील हापूस, केशर, पायरी, लालबाग, तोतापुरी, बदामी व लोकल इत्यादी आंबा उत्पादक शेतकरी यांनी आंबा महोत्सवामध्ये आपला आंबा विक्रीसाठी आणावा. शेतकऱ्यांच्यासाठी बाजार समितीच्या वतीने स्टॉल, पिण्याचे पाणी, लाईट इत्यादी सुविधा विनामूल्य पुरवण्यात येणार आहेत. त्यामुळे तालुक्यातील आंबा खरेदीदार ग्राहकांनी आंबा महोत्सवामध्ये आंबा खरेदीसाठी यावे. असे आवाहन बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी केले आहे.