
माणदेश एक्सप्रेस न्युज
तासगाव : स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सामाजिक क्रांती घडवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले हेच स्त्री शिक्षणाचे जनक आहेत असे उद्गार प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे यांनी पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त आयोजित केलेला कार्यक्रमात बोलताना काढले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन दि. ८ एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान महाविद्यालयात करण्यात आले. प्राचार्य पुढे म्हणाले खऱ्या खुऱ्या स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहणारे,भारतीय समाज रचनेचा कायापालट करणारा एक महान क्रांतिसूर्य म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले.मुलींसाठी पहिली शाळा काढून पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षिका म्हणून नेमले.समाजात प्रचलित असलेल्या स्त्रीविरोधी दुष्कृत्ये आणि त्यांच्या शोषणाविरुद्ध आवाज उठवणारे थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांचे महिला सक्षमीकरणातील महत्त्वाचे योगदान म्हणून नेहमीच स्मरणात ठेवले जाईल.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रम कमिटी प्रमुख डॉ. साईनाथ घोगरे यांनी केले तर आभार डॉ.शहाजी पाटील यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले.कार्यक्रमाला उपप्राचार्य जे.ए.यादव, प्रबंधक एम.बी.कदम यांसह सर्व विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय सेवक वर्ग, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.