
माणदेश एक्सप्रेस/मुंबई : ‘नितेश राणेंनाही जेलमध्ये जावं लागणार. नारायण राणे हे एक दिवसच जेलमध्ये राहिले होते. पण नितेश राणेंना लांबचा मुक्काम होऊ शकतो’, असे विधान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले आहे. दानवेंच्या विधानाला राणेंनीही उत्तर दिले. ‘बघू, ते जातात की मी जातो’, असे राणे म्हणाले.
नितेश राणेंच्या या विधानाबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “नितेश राणेंनाही एक दिवस असंच जावं लागणार आहे. त्याची चिंता करू नका. ज्या पद्धतीने वक्तव्य नितेश राणेंकडून महाराष्ट्रात होत आहे. त्यांना तरी एक दिवस झालं. मला वाटतं लांबचा मुक्काम तुमचा होऊ शकतो.”
दानवे यांच्या विधानाबद्दल नितेश राणेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. ते म्हणाले, “हो ना. बघू, ते जातात की मी जातो. माझे जेलमध्ये जाण्याचे दिवस आता काही येत नाही. पण, कदाचित त्यांचे दिवस जवळ आले असतील. त्यांचे किंवा त्यांच्या मालकाचे. तेव्हा बघू. तेव्हा जेवणाचा डब्बा मीच पाठवतो, पाहिजे तर…”, असे उत्तर राणेंनी दानवेंना दिलं.