कोलकाता नाईट रायडर्स आयपीएल 2024 चॅम्पियन, हैदराबादवर फायनलमध्ये 8 विकेट्सने धमाकेदार विजय

0
2

माणदेश एक्सप्रेस न्युज : कोलकाता नाईट रायडर्सने इतिहास रचला आहे. केकेआरने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 8 विकेट्सने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सनरायजर्स हैदराबादने केकेआरसमोर 114 धावांचं आव्हान दिलं होतं. केकेआरने हे आव्हान सहज पार केलं. केकेआरने 10.3 ओव्हरमध्ये विकेट्स गमावून 114 धावा केल्या.

केकेआरची ही आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची एकूण तिसरी तर 2012 नंतर चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममध्ये अंतिम सामना जिंकण्याची दुसरी वेळ ठरली. केकेआरने याआधी 2012 साली पहिल्यांदा चेन्नईला पराभूत करत आयपीएल ट्रॉफी जिंकली होती.

अंतिम सामन्यात सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून कॅप्टन पॅट कमिन्स याने बॅटिंगचा निर्णय घेतला. मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादचा निर्णय चुकीचा ठरवला. केकेआरच्या गोलंदाजांनी हैदराबादला 18.3 ओव्हरमध्ये 113 धावांवर गुंडाळलं. हैदराबादकडून पॅट कमिन्स याने 24, एडन मारक्रम 20, हेन्रिक क्लासेन 16 आणि नितीश रेड्डीने 13 धावांच योगदान दिलं. तर केकेआरकडून आंद्रे रसेल याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क आणि हर्षित राणा जोडीने 2-2 विकेट्स मिळवल्या. तर सुनील नरीन, वरुण चक्रवर्थी आणि मिचेल स्टार्क या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here