EVM ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही अचानक बंद ; “या” जिल्ह्यामधून धक्कादायक प्रकार समोर ; उमेदवाराच्या फोननंतर प्रशासनाला आली जाग

0
2

माणदेश एक्सप्रेस न्युज/जळगाव/ : जळगाव येथे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँग रुमचे CCTV डिस्प्ले चार मिनिटांसाठी बंद पडल्याची घटना घडली. तर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे जनरेटरवरून इन्व्हर्टरवर वीज पुरवठा स्थलांतरित करताना सीसीटीव्ही बंद झाले होते.

याबाबतची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. तर डिस्प्ले बंद झाल्यानंतर सर्व ठिकाणच्या 36 कॅमेऱ्यांचं फुटेज उपलब्ध असून सीसीटीव्ही बंद असतानाच्या काळातील व्हीडिओ शूटिंग उपलब्ध असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

या घटनेची माहिती महाविकास आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांनी फोनवरुन कळवली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला. आज रविवारी सकाळी 9 ते 9.04 मिनिटाच्या काळात ईव्हीएम मशीन ठेवलेल्या स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डिस्प्ले अचानक बंद पडले. याबाबतची माहिती समोर येताच लगेच हा वीज पुरवठा सुरळीक करण्यात आला. मात्र, या घटनेमुळे उमेदवारांची धाकधूक चांगलीच वाढली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here