EVM तोडफोडप्रकरणी भाजप उमेदवाराला अटक ; जामीन न मिळाल्यास तुरुंगातून पहावा लागणार निकाल

0
2

माणदेश एक्सप्रेस न्युज : ओडिशामध्ये लोकसभेबरोबच विधानसभेसाठीही मतदान झाले. मतदान सुरू असताना भाजप उमेदवाराने बराचवेळ रांगेत उभे राहावे लागल्याने थेट EVM मशीनची तोडफोड केल्याची घटना घडली. या घटनेनंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. आता ते जेलमध्ये आहे. त्यांना जामीन न मिळाल्यास जेलमधून निकाल पाहावा लागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.

ओडिशातील चिल्का विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार प्रशांत जगदेव यांना जेलवारी करावी लागली आहे. ते मतदानासाठी पत्नीसह एका मतदान केंद्रावर केले होते. ईव्हीएम मशीन खराब झाल्यामुळे त्यांना बराचवेळ रांगेत उभे राहावे लागले. त्यामुळे संतापलेल्या जगदेव यांनी केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत वाद झाला. वाद टोकाला पोहचल्यानंतर जगदेव यांनी ईव्हीएम मशीन हिसकावून घेत जमिनीवर फेकली. त्यामुळे मशीन तुटली.

पोलिस अधिक्षक अविनाश कुमार यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर जगदेव यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना कोर्टात सादर केल्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आमदारांनी (MLA) मतदान केंद्रावर गोंधळ घातला. मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण करून येथील कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तन केल्याचा तक्रार जगदेव यांच्याविरोधात करण्यात आली आहे.

 

जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास सांगितल्याचे अविनाश कुमार यांनी नमूद केले. भाजपने हे आरोप फेटाळून लावले आहे. एका नेत्याने दावा केला आहे की, ‘जगदेव यांच्यावरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here