सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमा : आम. गोपीचंद पडळकर

0
9

माणदेश एक्सप्रेस न्युज/सांगली/प्रतिनिधी : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत दुष्काळी मदतनिधीच्या रक्कमेत तब्बल अडीच कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे निष्पण झाले आहे. या प्रकरणावरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आक्रमक झाले आहेत.

 

सांगली जिल्हा बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून बॅंकेवर प्रशासक नेमण्याची मागणी पडळकर यांनी सरकारकडे केली आहे.
या प्रकरणी सहकार विभागाकडून चाचणी लेखा परीक्षण करण्याची मागणी होत आहे. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात येत आहे. यापूर्वीही नोकर भरतीच्या नावाखालीही सांगली जिल्हा बॅंकेत गैरव्यवहार झाला होता. तसेच, कर्ज वितरण आणि थकबाकी प्रकरणीही बॅंक अडचणीत सापडली होती. त्या वेळी बॅंकेच्या चौकशीची मागणी करण्यात आली होती.

 

यावेळी बोलताना ते म्हणाले, बँकेच्या तत्कालीन संचालक मंडळाच्या नोकर भरती आणि इतर घोटाळ्यानंतर शाखाधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घोटाळ्याचे मालिका सुरू आहे. दुष्काळ निधीमध्येही आता घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे. आता बँकेच्या 219 शाखांची तपासणी म्हणजे घोटाळा करणाऱ्या मंडळींकडूनच घोटाळ्याच्या चौकशीचा प्रकार आहे, असेही पडळकर यांनी म्हटले आहे.

 

घोटाळ्यांच्या सदोष आणि सखोल चौकशीसाठी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी होत आहे. बँकेतील नोकरभरती घोटाळा प्रकरणीही विधान परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. गोपीचंद पडळकर यांच्या मागणीनंतर तत्कालीन सहकार मंत्र्यांनी बँकेचे चौकशीसाठी समिती नेमली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here