आयपीएल मोठा निर्णय घेणार? मुंबई इंडियन्स देणार हार्दिक पांड्याला डच्चू?

0
1013

गेल्या काही दिवसांपासून भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पांड्या चांगलाच चर्चेत आहे. मुंबई इंडियन्स या आयपीएल टीमने दिलेले कर्णधारपदाचे पद आणि वैयक्तिक आयुष्यात चालू असलेले चढउतार यामुळे तो सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, याच हार्दिक पांड्याबद्दल आता नवी माहिती समोर येत आहे. मिळालेल्यामाहितीनुसार आयपएल टीम मुंबई इंडियन्सला रिलीज (करारमुक्त) करण्याची शक्यता आहे. मुंबई इंडियन्सने हार्दिकला रिलीज केल्यास ही फार मोठी बाब म्हणावी लागेल.

हार्दिक पांड्याला डच्चू मिळणार?
मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी बीसीसीआय वानखेडे येथील कार्यालयात आयपीएलचे अधिकारी आणि संघांचे मालक यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत आयपीएलचे संघ आणि आयपीएलचे अधिकारी यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला रिलिज करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 2024 साली मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला पुन्हा एकदा संघात सामील करून घेतले होते. 2024 साली संघाने क्रिकेटपटू रोहित शर्माजवळचे कर्णधारपद घेऊन ते हार्दिकला दिले होते. हार्दिककडे नेतृत्त्व गेल्यानंतर मुंबई इंडियन्स ही टीम फार काही कामगिरी करू शकली नाही. प्लेऑफ सामन्यांतही या संघाला स्थान मिळाले नाही. त्यानंतर आता मुंबई इंडियन्स हा संघ हार्दिक पांड्याला करारमुक्त करण्याची शक्यता आहे.

आगामी मेगा ऑक्शनमध्ये मोठे बदल होणार
आयपीएलच्या नियमांनुसार प्रत्येक तीन वर्षांनी एका मेगा ऑक्शनचे आयोजन केले जाते. या वर्षी डिसेंबर महिन्यात मेगा ऑक्शनचे आयोजन होईल. या मेगा ऑक्शनअंतर्गत सर्व 10 संघांना फक्त चार-चार खेळाडू रिटेन करता येतील. यावेळी रिटेन करावयाच्या खेळाडूंच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

मुंबई इंडियन्स या चार खेळाडूंना करणार रिटेन
सूत्रांच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, जसप्रित बुमराह यांना रिटेन करण्याची शक्यता आहे. तर हार्दिक पांड्याला यावेळी रिलिज केले जाऊ शकते. सध्या सूर्यकुमार यादव हा टी-20 भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्यामुळेच मंबई इंडियन्स सूर्यकुमार यादकडे कर्णधारपद देऊ शकते. रोहित शर्मा सूर्यकुमार यादवच्या नेतृतत्त्वात खेळ शकतो, मुंबई इंडियन्स रोहित शर्मा, सर्यकुमार यादव जसप्रित बुमराह, तिलक वर्मा या चार खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी आयपीए नेमकं काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here