जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून पुण्यात एकता नगर भागामध्ये लष्कराची तुकडी तैनात

0
192

सततचा मुसळधार पाऊस आणि खडकवासला धरणातून अतिरिक्त पाणी सोडल्यानंतर, जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून एकता नगर परिसरात लष्कराची तुकडी तैनात करण्यात आली आहे. यामध्ये इंजिनिअर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसह सुमारे 100 कर्मचारी, आवश्यक वाहने आणि पुरवठा यांनी सुसज्ज ठेवण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कर कडून देण्यात आली आहे. मुठा नदीत पाण्याची पातळी वाढल्याने एकता नगर येथील द्वारका इमारतीच्या बेसमेंट पार्किंगमध्ये पाणी शिरले. घटनास्थळी लष्कराचे जवान आणि पुणे अग्निशमन दलाचे जवान दाखल आहेत.

पहा पोस्ट:

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here