चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ जाहीर!

0
2723

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील १५ सदस्यीय भारतीय संघ जाहीर केला आहे. हाच संघ इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळणार आहे. या संघाच्या उपकर्णधारपदी युवा खेळाडू शुबमन गिलची वर्णी लागली आहे. त्याचबरोबर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेदरम्यान जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने त्याच्या जागी हर्षित राणा खेळणार आहे.

 

चॅम्पियन्स ट्रॉफी आणि इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारतीय संघात काही बदल करण्यात आले आहेत. ज्यामध्ये मोहम्मद शमी खूप दिवसांनी पुनरागमन झाले आहे. तो २०२४ च्या विश्वचषकानंतरपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर होता. विशेष म्हणजे यशस्वी जैस्वाला पहिल्यादांच वनडे संघात स्थान मिळालं आहे. यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईमध्ये हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवली जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १९ फेब्रुवारीला यजमान पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात कराची येथे होणार आहे.

 

यात, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा.

 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये ८ संघांमध्ये एकूण १५ सामने होणार आहेत. संघांची २ गटात विभागणी करण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान एकाच गट-अ मध्ये आहेत. त्यांच्यासह उर्वरित दोन संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश आहेत. तर दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड यांना ब गटात ठेवण्यात आले आहे. सर्व ८ संघ आपापल्या गटात ३-३ सामने खेळतील. यानंतर, प्रत्येक गटातील टॉप-२ संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. पहिला उपांत्य सामना दुबईत, तर दुसरा लाहोरमध्ये होणार आहे. यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल.